पुणे – महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. यात महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांच्या तपासणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केला होता.
यात बारामती विधानसभा मतदासंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मत पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र आता युगेंद्र पवारांनी मत पडताळणी प्रक्रियेतून माघार घेतली आहे. यासाठी युगेंद्र पवार यांनी जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज करून माघार घेत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मतदान यंत्राविरोधात आंदोलनाची हाक दिल्यानंतर युगेंद्र पवार यांनी अचान