मोदींची १४ नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे सभा

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ नोव्हेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.ते महायुतीच्या उमेदवारांसाठी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या १० प्रचारसभांचे नियोजन भाजपाने केले आहे. ८ नोव्हेंबरला धुळे आणि नाशिकमध्ये पहिली सभा होणार आहे. त्यानंतर ९ नोव्हेंबरला अकोला आणि नांदेडमध्ये त्यांची सभा होणार आहेत. १२ नोव्हेंबरला चंद्रपूर, सोलापूर, पुण्यात आणि १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबईत त्यांची सभा होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top