मुंबई- नवीन जाहिरात फलक धोरणाचा मसुदा नुकताच मुंबई महापालिकेने जाहीर केला आहे.त्यामध्ये डिजिटल,इलेक्ट्रॉनिक, एलसीडी आणि एलईडी जाहिरातींवर काही निर्बंध घातले आहेत. अशा जाहिराती रात्री ११ वाजल्यानंतर बंद केल्या जाणार आहेत. या जाहिरातींमधील प्रकाशाच्या तीव्रतेवर बंधने असणार आहेत.
यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नियुक्त केली असून जाहिरात फलकांच्या प्रकाशाच्या प्रखरतेची मानके निश्चित केली जाणार आहेत. यामध्ये डिजिटल होर्डिग गटातील चालू-बंद होणार्या जाहिराती,कॅन्टीलिव्हर,
गॅन्ट्री,सायकलवरील जाहिराती आदींवर नवीन धोरणानुसार बंदी असणार आहे. सध्या यासाठी परवानगी आहे. मात्र परवानगीचे आता नूतनीकरण होणार नाही. डिजिटल, इलेक्ट्रॉनिक,एलसीडी आणि एलईडी या जाहिराती रात्री ११ वाजता बंद केल्या जातील. त्यासाठी स्वयंचलित टायमर बसविणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे भिंती व आकाशात लेझर शो करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा ना- हरकत दाखला घेणे अनिवार्य असणार आहे.