मुंबई
मुंबईतील रेल्वेमार्गावरच्या महत्वाच्या अभियांत्रिकी कामांसाठी मुंबईत मध्य, पश्चिम व ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. हार्बर मार्गावर मात्र मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आलेली नाही.मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावर सकाळी १० वाजून ५५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते अंधेरी अप आणि गोरेगाव ते बोरिवली डाऊन जलद मार्गावर सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि नेरुळ या मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.