मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नववा पूल बांधून पूर्ण

अहमदाबाद – मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वापी ते सुरत मार्गावरील शेवटचा व नवव्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या बांधकामातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.वापी ते सुरत दरम्यान या रेल्वेमार्गावर नऊ नद्या असून त्यावरील खाकेरा नदीवरील पूल २९ ऑक्टोबर रोजी बांधून पूर्ण झाला आहे. खाकेरा नदी ही गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात एकूण २० पूल असून त्यातील नऊ पूर बांधून पूर्ण झाले आहेत. या मार्गावर आतापर्यंत खाकेरा, कालाक, पार, औरंगा, पुर्णा, मिंड्होला, कावेरी आणि वैनगंगा या नद्यांवरील पूल आतापर्यंत बांधून पूर्ण झाले आहेत. या बरोबरच दाहाधर व मोहार नदीवरील पुलही बांधून पूर्ण झाले आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा ५०८ किलोमीटर चा असून यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा वेळ २ तासांवर येणार आहे. या रेल्वेमार्गावरून ताशी ३२० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार आहे.