मुंबई- मध्य रेल्वेने कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेता कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष गाड्या आणि कोल्हापूर ते सातारा दरम्यान १४ अनारक्षित विशेष गाड्या अशा एकूण २८ रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.आज ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट पर्यंत दररोज या गाड्या सोडल्या जातील.
सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता या २८ अनारक्षित विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर या गाड्यांना तात्पुरता थांबाही देण्यात आला आहे.सातारा गाडीसाठी वळीवडे, रुकडी, हातकणंगले,जयसिंगपूर, मिरज,विश्रामबाग,सांगली, नंदरे,भिलवडी, किर्लोस्करवाडी,ताकारी, भवानीनगर,शेणोली, कराड,
शिरवडे, मसूर, तारगांव, रहिमतपूर आणि कोरेगांव हे थांबे राहणार आहेत.तर मिरज गाडीसाठी वळीवडे, रुकडी,हातकणंगले,जयसिंगपूर हे थांबे असणार आहेत.