मुंबई- भुलाभाई देसाई मार्गावरील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरातील देवींचे सिंदूर लेपन हा धार्मिक विधी केला जाणार आहे. त्यामुळे आज बुधवार ७ ते सोमवार १९ फेब्रुवारी या कालावधीत देवीचा गाभारा भाविकांना दर्शनासाठी पूर्णत बंद ठेवण्यात येणार आहे,अशी माहिती महालक्ष्मी न्यासाने दिली आहे.
या १३ दिवसांच्या गाभारा बंद कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष देवीच्या मूर्तीच्या दर्शनाऐवजी केवळ देवीच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे.तसेच मंगळवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे भाविकांना गाभार्यातून देवीचे दर्शन घेता येणार आहे.या मंदिरात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.