मुंबई – निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात गेले आठ-दहा दिवस जे काही धिंडवडे चालले आहेत तो महाराष्ट्र लुटण्याचा ट्रेलर सुरू आहे,अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज भाजपावर बोचरी टीका केली.
भाजपाचा विजय म्हणजे मराठी माणसाचा पराभव असाच समज काहींनी करून घेतला आहे. मराठी माणसाला मारवाडीमध्ये बोलण्यासाठी दमदाटी केली जाते. उचलून आणण्याची भाषा केली जाते आणि हे सर्व होणारे मुख्यमंत्री आणि दोन दोन उप मुख्यमंत्री मुकाट सहन करीत आहेत, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अख्खा महाराष्ट्र लुटण्यासाठी महाराष्ट्र द्रोह्यांच्या हाती दिला आहे. त्याचे ट्रेलर आपण गेले काही दिवस पाहात आहोत,असे राऊत म्हणाले.
भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापन करण्यासाठी एवढ्या खटपटी कराव्या लागत असतील तर हे सरकार चालवणे किती कठीण जाईल याचा विचार न केलेलाच बरा, असा टोलाही राऊत यांनी लगावला.