ब्राझिलिया- ब्राझीलमध्ये बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत ३८ जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर टियाफिलो ओटानी शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत मिनास गेराइसच्या तेओफिलो ओटोनी शहराजवळ आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस साओ पाउलोहून निघाली होती आणि त्यात ४५ प्रवासी होते. मात्र वाटेत बसचा टायर फुटला आणि नंतर ती ट्रकला धडकली. या अपघातात एक कारही बसवर धडकली. मात्र त्यात प्रवास करणारे तिघे सुखरूप बचावले. या अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी तत्काळ बचावकार्य सुरू केले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |