वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी माघार घेतली आहे. त्यांनी कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे . मात्र आता डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार कोण हे पक्षाच्या आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या बैठकीत अधिकृतपणे जाहीर होईल .आपल्या उमेदवारी संदर्भात कमला हॅरिस म्हणाल्या की मला जर राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली तर तो माझ्यासाठी गौरव असेल. मी डेमोक्रॅटिक पक्षाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. मला विश्वास आहे की राष्ट्रपती पदासाठीची उमेदवारी मला मिळेल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२५ चा अतिरेकी अजेंडा विरोधात लढून मी जिंकून येईन. आपला देश पुन्हा एकत्र आणेन. कमला हॅरिस यांनी उमेदवारी साठी दावा केला असला तरी त्यांच्याच पक्षात राष्ट्राध्यक्ष पदासाठी आणखी दोन दावेदार आहेत.
