नागपूर – भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे मित्र आणि राजकीय शत्रू म्हणून आवडीचा नेता आहे असे आज काॅंग्रेस नेते विजय वड्डेटिवार म्हणाले .
ते पुढे म्हणाले की, आता फडणवीस यांना कुबड्यांची गरज नाही. कारण आता कुबड्याच त्यांच्यावर विसंबून आहेत. आता त्यांना मोकळ्या हाताने काम करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कालच्या फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडणे स्वाभाविक आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्या नेत्याला सत्ता मिळूनही सर्वोच्च खुर्ची मिळाली नाही. एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या आशिर्वादानेच त्यांना सत्तेत राहता येईल अन्यथा ते काहीही करु शकणार नाही. ते विरोधही करु शकणार नाही. सत्ता नाही दिली, तरी गप्प बसण्याशिवाय त्यांच्याकडे मार्ग शिल्लक नाही.