श्रीवर्धन -मराठी गीतकार-पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचे आज दुपारी श्रीवर्धनमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वातील शीर्षकगीतांचा जादूगर हरपल्याची भावना मराठी कलाकारांनी व्यक्त केली. वादळवाट आणि आभाळमाया या मालिकांच्या शीर्षकगीतांमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनेता शाहरुख खानच्या गाजलेल्या येस बॉस चित्रपटाच्या पटकथालेखनाही जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. अनेक वर्षांपूर्वी टीव्हीवर गाजलेल्या विजया महेता दिग्दर्शित लाइफलाइन या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती.
