प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर

कोल्हापूर- इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रशांत कोरटकरला आज जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याची कळंबा तुरुंगातून सुटका होणार आहे.
या प्रकरणी इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे म्हणाले की, ज्या कलमांच्या आधारे प्रशांत कोरटकरवर गुन्ह्याची नोंद झाली होती त्यामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नव्हती. त्यामुळे तांत्रिक गोष्टींचा आधार घेत त्याला जामीन मंजूर होणे साहजिक आहे. प्रशांत कोरटकरने जे वक्तव्य केले त्याची व्याप्ती न्यायाधीशांनी लक्षात घ्यायला हवी होती आणि त्याला जामीन द्यायला नको होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण न झाल्याचे लेखी दिले होते. तरीही त्याला जामीन मंजूर झाला आहे. ज्या अटींच्या आधारे जामीन मिळाला त्याचे उल्लंघन केल्यास त्याचा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. प्रशांत कोरटकरला आधी 3 दिवस आणि दोन दिवस पोलीस कोठडी दिली होती . त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामीन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.