पुणे- पुण्यात राहणाऱ्या एका जोडप्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. हिरगप्पा जमादार (५०) आणि सौमयशरी मड्डे (२७) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दोघे मुळचे कर्नाटकच्या कलबुर्गीचे आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लटफॉर्म क्रमांक ४ जवळील रेल्वे रुळावर काल सकाळी जोडप्याने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्याजवळ असलेल्या आधारकार्डमुळे त्यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. ते सध्या कुर्डवाडीत राहत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे कुर्डवाडी ते पुणे असे प्रवासाचे तिकीट मिळाले. दोघांची ओळख पटली असली तरी पुण्यात येऊन आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजून आले नाही.