बीड – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडेंचा झालेला पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. काही दिवसांपूर्वी पंकजाच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आज आणखी एका कार्यकर्त्याने आपले जीवन संपवले .
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदार संघात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. या पराभवामुळे पंकजाच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरले होते. याच नैराश्यातून एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे असे काही टोकाचे पाऊल उचलू नका अशी पंकजाने सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली होती . तरीही आज शिरूर कासार तालुक्यातील वारणी गावात पंकजाचे कार्यकर्ते गणेश उर्फ हरिभाऊ भाऊसाहेब बडे यांनी आत्महत्या केली .