वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे निकाल काल जाहीर झाले. त्यांनंतर लगेचच पराभूत झालेल्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये मतभेद झाल्याची चर्चा सुरू झाली.
निकालाच्या आदल्या रात्री मतदानाचे निकाल पाहण्यासाठी बायडेन कमला हॅरीस आणि पक्ष सहकाऱ्यांसोबत हजर नव्हते. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये आपली पत्नी, काही निवडक निकटवर्तीय आणि व्हाईट हाऊसमधील स्टाफसोबत निवडणुकीचे निकाल पाहिले. त्यामुळे बायडेन आणि हॅरीस यांच्या काही तरी बिनसले , अशी चर्चा होत आहे.