रांची – भारताचा माजी कर्णधार व क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी आपल्या घराचा व्यावसायिक वापर करत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धोनीला नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.महेंद्रसिंग धोनी याच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल झारखंड सरकारने त्याला रांची मध्ये घरासाठी जागा भेट दिली होती. त्या जागेवर धोनीने घर बांधले. पाच कोठी या वस्तीत हे घर असून या घराचा सध्या व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती झारखंड राज्य गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष संजय लाल पासवान यांनी दिली. या तक्रारीमध्ये जर तथ्य आढळले तर धोनीला त्या संदर्भात नोटीस दिली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |