देशाची परकीय गंगाजळी घटली ६५२.८६ अब्ज डॉलरवर घसरण

मुंबई – देशाच्या परकीय गंगाजळीत पुन्हा एकदा घट झाली आहे.भारतीय रिझर्व्ह बॅंकेने काल शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १३ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.९८८ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६५२.८६९ अब्ज डॉलरवर आली.मागील अहवाल आठवड्यात, एकूण गंगाजळी ३.२३५ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६५४.८५७ अब्ज डॉलर झाली होती.

सप्टेंबरच्या अखेरीस ७०४.८८५ अब्ज अमेरिकन डॉलरचा सार्वकालिक उच्चांक गाठणारी गंगाजळी आता अनेक आठवड्यांपासून घसरत आहे.अशावेळी रुपयाही दबावाखाली होता.१३ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात गंगाजळीचा एक प्रमुख घटक परकीय चलन मालमत्ता ३.०४७ अब्ज डॉलरने घटून ५६२.५७६ अब्ज डॉलर झाली,असे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून दिसून आले.

आठवडाभरात सोन्याचा साठा १.१२१ अब्ज डॉलरने घटून ६५.०५६ अब्ज डॉलर झाला,असे आरबीआयने सांगितले.तर स्पेशल ड्रॉइंग राइट्स ३५ दशलक्ष अमेरिकन डॉलरने कमी होऊन १७.९९७ अब्ज डॉलर झाले आहेत.तसेच आयएमएफमधील भारताची राखीव स्थिती देखील अहवालाच्या आठवड्यात २७ दशलक्ष अमेरिकन डॉलरने घसरून ४.२४ अब्ज डॉलर झाली आहे,असे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत दिसून आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top