दिल्लीतील ६० वर्षांवरील व्यक्तींना मोफत उपचार! केजरीवालांची नवी घोषणा

नवी दिल्ली- आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज आणखी एक नवी घोषणा केली. त्यावेळी केजरीवाल म्हणाले की, मी दिल्लीतील लोकांसाठी संजीवनी योजना सुरू करणार आहे. ६० वर्षांवरील वृद्धांना मोफत उपचार मिळणार आहेत. सर्व उपचाराचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे. या योजनेसाठी घरोघरी जाऊन नोंदणी करणार आहेत.
केजरीवाल यांनी म्हणाले की, या योजनेतून सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहे. एपीएल आणि बीपीएल कार्ड आवश्यक नाही. त्याची नोंदणी दोन-तीन दिवसांत सुरू होईल. आमचे कार्यकर्ते लोकांच्या घरी जाणार आहेत. कार्यकर्ते कार्ड देतील. निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे सरकार आले तर ते आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणार आहे. याआधी दिल्ली सरकारने महिलांसाठी महिला सन्मान योजना आणली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर सरकार दरमहा १ हजार रुपये पाठवणार आहे. त्यासोबत केजरीवाल यांनी निवडणुकीनंतर महिलांना १००० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचेही जाहीर केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top