नवी दिल्ली- पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात आज दुपारी एका रेस्टॉरंटला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला . रेस्टॉरंटला आग लागताच लोकांनी या रेस्टॉरंटच्या छतावरुन बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे काही लोक जखमी झाले.या आगीची झळ आजूबाजूच्या दुकानाला बसली.त्यामुळे दुकानांचे मोठे नुकसान झाले.
या आगीचा धूर सर्वदूर पसरला होता आणि घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६० जवानांसह १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. ही आग नेमक्या कोणत्याही कारणामुळे लागली हे उघड झालेले नाही.या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.