मुंबई – एलिफंटा बोट दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला . यात कुटुंबियांना न सांगताच एलिफंटाला गेलेले गोवंडीतील इस्टेट एजंट दिपकचंद वाकचौरे यांचाही समावेश आहे. त्यांच्या मृत्यूच्या धक्कादायक बातमीने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जेजेच्या शवागृहात येताच वाकचौरेंच्या पत्नीने तो मला फसवून गेलो हो असा टाहो फोडला
दीपकचंद वाकचौरे(४४) यांचा बोट दुर्घटनेत मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी दोन मृतदेह जे. जे. रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यामधील एक मृतदेह दीपकचंद यांचा होता. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांची पत्नी वनिता आणि मुलगी तन्वी या जेजे रुग्णालयाच्या शवागारात आल्या होत्या. मृतदेह ताब्यात घेताच त्यांची पत्नी वनिता यांनी मला तो फसवून गेला, असे सांगत परिसरातच टाहो फोडला. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे अन्य नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.गोवंडी येथे राहणारे दीपकचंद वाकचौरे हे रिअल इस्टेट एजंटचे काम करत होते. बुधवारी ते कुणाला न सांगताच गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी फिरायला गेले. त्यांनी तेथून एलिफंटा येथे जाणारी बोट पकडली, त्यावेळी बोट अपघातात त्यांचा मृत्यू झाला. गुरुवार सकाळपर्यंत वाकचौरे यांच्या कुटुंबातील कुणालाही काही माहीत नव्हते. दीपकचंद यांची मुलगी तन्वी चेंबूर येथील आचार्य कॉलेजमध्ये बारावीला शिकते. ते नेहमी मुलीला कॉलेजातून घ्यायला जायचे. बुधवारी मात्र ते घ्यायला न आल्याने तिने वडिलांना फोन करण्यास सुरुवात केली. मात्र, फोन बंद येत असल्याचे तिने घरी कळविले.त्यानंतर शोधाशोध सुरु झाली.