टी-सिरीजच्या मालकाच्या मुलीचा कॅन्सरने मृत्यू

बर्लिन – टी-सिरीज कंपनीचे भागिदार किशन कुमार यांची कन्या टीशा हिचे काल वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. जर्मनीतील एका खासगी रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. टी-सिरीजचे मालक भूषण कुमार हे टीशाचे चुलतभाऊ आहेत तर किशन कुमार हे टी-सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे बंधू आहेत.

टीशा बरीच वर्षे कर्करोगाशी झुंज देत होती. अभिनेता रणबीर कपूर याची मुख्य भूमिका असलेल्या ‘अॅनिमल ‘ या चित्रपटाच्या प्रिमियर शोच्या निमित्ताने ३० नोव्हेंबर २०२३ रोजी टीशा प्रसिध्दी माध्यमांसमोर आली होती. त्यानंतर ती कधीही सार्वजनिक कार्यमांमध्ये सहभागी झाल्याचे दिसले नाही. टी-सिरीजच्या प्रवक्त्यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करून टीशाच्या निधनाची माहिती दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top