छत्रपती संभाजी नगर – मराठवाड्यातील महत्त्वाचे नाथसागर जलाशय अर्थात जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले असून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.जायकवाडी धरण आज सकाळपर्यंत ९७.३० टक्के भरले. त्याच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस व धरणातील पाण्याची आवक पाहाता या धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात ३ हजार १४४ क्युसेक दराने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या विसर्गामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढणार आहे. गोदावरीच्या नदीपात्रात प्रवेश करु नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. धरणातील पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |