मुंबई- जगभरातील खाद्यपदार्थांचा नुकताच अभ्यास करण्यात आला.या अभ्यासात जगभरात मुंबईतील वडापावने पाचवा क्रमांक पटकावला आहे. प्रसिद्ध खाद्य आणि प्रवास मार्गदर्शक टेस्ट अटलासच्या यंदाच्या वर्ल्ड फूड अवॉर्ड्सची नुकतीच घोषणा करण्यात आली.यात जगभरातील १०० शहरांतील खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
शहरानुसार पहिल्या दहा शहरांमध्ये नेपल्स, मिलान, बोलोगना,फ्लोरन्स, मुंबई, रोम,पॅरिस,व्हियना, तुरीन, ओसाका या शहरांचा समावेश आहे.सर्वोत्तम जागतिक खाद्य शहरांच्या क्रमवारीत युरोपियन शहरांचे वर्चस्व आहे.
इटालियन खाद्यपदार्थाने जगातील द्वितीय सर्वोत्कृष्ट स्थान मिळवले आहे, तर पिझ्झा या नेपोलेतानाने जागतिक स्तरावर दुसऱ्या सर्वोत्कृष्ट डिशचा मान पटकावला आहे.विशेष म्हणजे या यादीत दोन आशियाई शहरेदेखील समाविष्ट आहेत.भारतातील एक शहर मुंबई आणि जपानमधील ओसाका, ज्याला ‘किचन ऑफ द नेशन’ असे टोपणनाव देण्यात आले आहे.पहिली टॉप टेन शहरे आणि त्यांचे खाद्यपदार्थ पुढीलप्रमाणे: पिझ्झा मजेरेटा- इटली, रिसोटो आला मिलानसे – इटली,तागलीआटले अल रागू-इटली,बिस्तेक्का अल्ला फ्लोरेंटीना – इटली, वडापाव -भारत,स्पागेट्टी अल्ला कार्बनारा- इटली क्रेमे ब्रुली – फ्रान्स, झिवीब्रेलरोस्टब्रॅटेन – ऑस्ट्रिया,अगनोलोट्टी – इटली,टोकोयाकी – जपान अशी आहेत.