श्रीनगर – येत्या १९ एप्रिलपासून जम्मूहून श्रीनगरला जाणारी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. जम्मू ते श्रीनगर अशा तीन तासांच्या प्रवासात वंदे भारत तब्बल ३६ बोगद्यांतून जाईल. २७२ किलोमीटरपैकी ११९ किलोमीटरचा प्रवास बोगद्यातून जाणार आहे.
ही ट्रेन उधमपूर-श्रीनगर बारामुल्ला रेल लिंकसह डोंगराळ भागातील बोगद्यांतून धावणार आहे. नव्या वंदे भारतमधून एकूण ५३० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. या ट्रेनमध्ये १ एक्झिक्युटिव्ह क्लास, ७ एसी चेअर कार आणि एकूण ८ कोच असतील. ही ट्रेन एकूण १८ स्थानकावरून जाईल. यामध्ये रियासी, बक्कल,दुग्गा, सावलकोटे,संगलदान, सुंबेर, खारी, बनीहाल, शाहाबाद हिल हॉल्ट, कांजीगुंड,सदुरा, अनंतनाग, बिजबेहरा, पंजगाम,अवंतीपोरा, रत्नीपोरा,काकापोरा, पंपोर स्थानकांचा समावेश आहे.