छगन भुजबळांना परदेशी जाण्य़ास विशेष न्यायालयाची परवानगी

मुंबई -भ्रष्टाचारप्रकरणी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना कुटुंबियांसोबत परदेशी जाण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने परवानगी दिली.
छगन भुजबळ यांना संयुक्त अरब अमिराती, मोरोक्को, केनिया आणि कतारला कुटुंबियांसोबत सहलीला जायचे आहे. मात्र त्यांचा पासपोर्ट अंमलबजावणी संचलनालयाने जप्त केला आहे. त्यामुळे भुजबळ यांनी न्यायालयात पासपोर्ट परत मिळविण्यासाठी अर्ज केला होता.
भुजबळ यांच्या अर्जावर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान भुजबळ यांना परदेशी जाण्यास परवानगी देण्यास ईडीच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. मात्र भुजबळ हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते विद्यमान आमदार आहेत. ते सामाजिक दृष्ट्या बरीच वर्षे सक्रिय आहेत. त्यामुळे परदेशी जाण्यास परवानगी दिल्यास ते फरार होण्याची शक्यता नाही,असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ईडीला त्यांचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top