बीजिंग – चीनच्या अवकाश कार्यक्रमाला रविवारी धक्का बसला.चीनच्या स्पेस पायोनियर या खासगी कंपनीचे ‘तियानलाँग-३’ हे रॉकेट चाचणीदरम्यान कोसळल्याची घटना रविवारी घडली.त्यामुळे चीनच्या अवकाश कार्यक्रमाला धक्का बसला आहे.सुदैवाने संबंधित भागातील नागरिकांना अगोदरच सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याने कोणतीही हानी झाली नाही.
‘तियानलाँग- ३’ हे लाँचपॅडपासून वेगळे झाले , पण काही अंतरावर वरच्या दिशेने नेणाऱ्या यंत्रणेत दोष झाला.परिणामी दुसऱ्या टप्प्याऐवजी पहिल्याच टप्प्यात त्याचा भाग वेगळा झाला आणि आग लागली. हे पेटलेले रॉकेट गोंगयी शहरातील पर्वतीय भागात कोसळले.जळत्या रॉकेटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या रॉकेटच्या आराखड्यातील सदोषामुळे ते कोसळले असे कंपनीने नमूद केले आहे. ग्राउंड टेस्टच्या वेळी रॉकेट आणि चाचणी तळ यांच्यातील कनेक्शन योग्यरित्या प्रस्थापित झाले नाही आणि ते लाँचपॅडवरच वेगळे झाले असे कंपनीने म्हटले आहे. अपघातग्रस्त तियानलाँग-३ हे एक मोठे वाहक रॉकेट असून त्याला चीनच्या सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्कच्या निर्मितीत मदत करण्यासाठी तयार केले होते.