बीजिंग – चीनने १९८०नंतर प्रथमच पॅसिफिक महासागरात आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. अमेरिकेत होत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेआधीच चीनने ही चाचणी घेतली आहे. चीनने या चाचणीमुळे जगाची सुरक्षा धोक्यात आणल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पॅसिफिक महासागरात अशा प्रकारची चाचणी घेतना त्या परिसरातील राष्ट्रांची परवानगी घ्यावी लागते, त्यामुळे या चाचणीचे गांभीर्य आणखी वाढले आहे. चीनच्या वेळेनुसार, आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली, तसेच ही चाचणी यशस्वी ठरली असे चीनने म्हटले आहे. या क्षेपणस्त्रांवर डमी स्फोटके (वॉरहेड) बसवण्यात आली होती. ही स्फोटके अाण्विकही असू शकतात. चीनने ही चाचणी नियमित प्रशिक्षणाचा भाग असल्याचे म्हटले आहे. मात्र, या चाचणीमुळे भारताची चिंता वाढली आहे.
