गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या २०३१ एसटी बसचे आरक्षण फुल्ल

मुंबई – कोकणात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. यासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणात जातात. या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून ४३०० बस सोडल्या जाणार आहेत. त्यापैकी २०३१ बसचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या बसेस सोडण्यात येणार आहेत. श्री गणेशाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिल्याने एसटीच्या नेहमी चालवल्या जाणाऱ्या १३०१ बसेससह २०३१ जादा बसेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top