कोलकाता – कोलकाता शहरात चालणारी ट्राम लवकरच बंद करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन म्हणून प्रसिद्ध असलेली ही ट्राम देशात केवळ कोलकात्यातच सुरू होती. आता ती केवळ मैदान ते एक्सप्लेनड या मार्गावर हेरिटेज सेवा म्हणून ती चालवण्यात येणार आहे. जवळजवळ दीडशे वर्ष कोलकात्याचे सांस्कृतीक वैभव असलेली ही ट्राम बंद करण्याला स्थानिकांनी जोरदार आक्षेप घेतला असून या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. ट्राम चालवण्यासंदर्भातील प्रकरणाची सुनावणी कलकत्ता उच्च न्यायालयात सुरू असून पुढील सुनावणीत सरकार आपली बाजू मांडणार आहे. मागील सुनावणीत उच्च न्यायालयाने खाजगी भागीदारीतून ट्राम सेवा सुरु ठेवण्याची सूचना केली होती.
