मुंबई – दिवाळीत अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून विविध भेटवस्तूंसह विशिष्ट रक्कम दिली जाते. मात्र एका कंपनीने ऑफिस कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि दुचाकी दिवाळी बोनस म्हणून दिली आहे. यामुळे या कंपनीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
स्ट्रक्चरल स्टील डिझाइन आणि डिटेलिंग कंपनी टीम डिटेलिंग सोलूशन्स या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच २८ कार आणि २९ दुचाकी भेट म्हणून दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांना उत्पादकता वाढवण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट दिले आहे. कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी केलेली मेहनत लक्षात घेऊन त्यांना हुंडाय, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज बेंझसारख्या विविध कंपन्यांच्या मोटारी भेट म्हणून दिल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांना दुचाकीही दिली आहे. तर इतर कर्माऱ्यांना विविध भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.