कुडाळ- मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथे मालवण-कोल्हापूर-तुळजापूर एसटी बसचा भीषण अपघात झाला . मुंबई गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेंनरवर एसटीची जोरदार धडक बसल्याने बसमधील १५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. बसमध्ये जवळपास ४० प्रवासी होते. सकाळी आठ वाजता हा अपघात घडला आहे. अपघातात जखमी झालेला प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एसटीचा अपघात! १५ प्रवासी जखमी
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/08/ACCIDENT-1.jpg)