देशातील प्रमुख ब्रँड असलेल्या एपिगामियाचे सह-संस्थापक रोहन मीरचंदानी यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. एपिगामियाची फ्लेव्हर्ड दही आणि ज्यूसचा प्रसिद्ध ब्रँड अशी ओळख आहे. एपिगामियाची पॅरेंट कंपनी असलेल्या ड्रम्स फूड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने याला दुजोरा दिला आहे.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी आणि द व्हार्टन स्कूलमधून पदवी शिक्षण घेतलेल्या मीरचंदानी यांनी २०१३ मध्ये ड्रम्स फूड इंटरनॅशनलची स्थापना केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली या ब्रँडने होकी पोकी आइस्क्रीम, एपिगामिया दही आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात नाव कमावले होते. त्यांची ३० शहरांमध्ये सुमारे २० हजार रिटेल शॉप आहेत. या कंपनीत अनेकांनी गुतंवणूक केली असून त्यात सिनेअभिनेत्री दीपिका पदुकोण हिचाही समावेश आहे.