जेरूसलेम – हमासच्या अतिरेक्यांनी गेल्यावर्षी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या महिला स्वत:ला असुरक्षित समजू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी बंदूकीचा परवान्यासाठी अर्ज केला आहे. अशा तब्बल ४२ हजार महिलांनी बंदुकीचा परवाना मिळावा म्हणून अर्ज केला आहे. त्यातील १८ हजार महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.
इस्रायलमध्ये नेत्यान्याहू यांचे उजव्या विचारांचे सरकार आले आल्यापासून पासूनच स्व-संरक्षणासाठी बंदूक खरेदीचे नियम शिथील केले आहेत. त्यामुळे महिला आता पुढे येऊन बंदूक खरेदीसाठी अर्ज करीत आहेत. सध्या इस्रायलमध्ये १५ हजाराहून अधिक महिलांकडे बंदुका आहेत, तर दहा हजार महिला बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.आपल्या सुरक्षेसंदर्भात महिला आता अधिक चिंतीत झाल्या आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर आपल्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे, ही महिलांची प्राथमिकता झाली आहे. त्यामुळे बंदुकीला स्वत:च्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी जास्त जवळ केले जात आहे. परंतु प्रत्येकाला ही बंदूक संस्कृती पसंत नाही अनेकजण या निर्णयामुळे नाराजदेखील आहेत. ते या धोरणावर टीका करत आहे.