चेन्नई – दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील विख्यात संगीतकार आणि भाजपाचे राज्यसभेतील खासदार इलियाराजा यांना सुप्रसिध्द श्रीविलिपुथूर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून मंदिर व्यवस्थापनाने रोखल्याने वाद निर्माण झाला.
देवदर्शनासाठी आलेले इलियाराजा यांनी श्रीविलिपुथूर अंदल मंदिर, नंदवनम धर्मस्थळाला भेट दिली. तिथे पुजारी आणि देवस्थानाच्या विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले . मात्र जेव्हा ते श्रीविलिपुथूर अंदल मंदिराच्या अर्थमंडपम गाभाऱ्यात प्रवेश करू लागले तेव्हा त्यांना अडवण्यात आले. त्यांना गाभाऱ्यापासून दूर नेण्यात आले.तिथून इलियाराजा यांनी देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला. त्यावरून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रीय उमटल्या. मंदिर व्यवस्थापनाच्या या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली.