अमेरिकेत रस्त्यावर झालेल्यागोळी बारात सात जण जखमी

केंटुकी – अमेरिकेतील केंटुकी शहराजवळच्या महामार्ग क्रमांक ७५ वर एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात ७ जण जखमी झाले आहेत. लंडनच्या पोलिसांनी या मार्गावर आपली गस्त वाढवली असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.येथील लंडन नावाच्या लहान शहरात ही घटना घडली.जोसेफ ए काऊच असे गोळीबार करणाऱ्या इसमाचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.त्याच्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी त्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे.गोळीबाराच्या घटनेला महापौर रेनजेल वेडीई यांनी दूजोरा दिला आहे. या व्यक्तीकडे बंदूक असून त्याच्यापासून सावध राहण्याचा व तो आढळल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच या महामार्गावरुन प्रवास करतांना दक्षता बाळगण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top