अभ्युदयनगरवासियांना २५ हजार रुपये घरभाडे

मुंबई- काळाचौकी येथील अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी अनेकदा निविदा काढूनही विकासक मिळत नसल्याने निविदा रद्द कराव्या आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात काही अटी-शर्तींमध्ये बदल करून नव्याने निविदा काढण्याचे निर्देश राज्य सरकारने म्हाडाला दिले आहेत.त्यानुसार आता अभ्युदयनगरवासियांना महिना २५ हजार घरभाडे देण्यात येणार आहे.