प्रसिद्ध युट्यूबर गौरव तनेजाने पाळीव कुत्रा ‘माऊ’ला का सोडले? कारण आले समोर, नेटिझन्स संतापले

फ्लाइंग बीस्ट (Flying Beast) म्हणून ओळखला जाणारा युट्यूब गौरव तनेजा (YouTuber Gaurav Taneja) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी घटस्फोटाच्या चर्चेमुळे तो चर्चेत आला होता. आता त्याचा पाळी कुत्रा माऊ मुळे पुन्हा सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.  

गौरव तनेजा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध यूट्यूबर्सपैकी (YouTuber) एक आहेत, ज्याचे जवळपास 10 मिलियन फॉलोअर्स आहेत. गेल्या काही वर्षांत तो व्लॉगच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील घडामोडी, फिटनेस आणि कौटुंबिक क्षण आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करत असल्याने प्रसिद्ध झाला. 

नुकताच त्याने त्याचा पाळीव कुत्रा असलेला माऊविषयी माहिती देणारा ‘व्हेअर इज माऊ?’ नावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये त्याने  त्याच्या कुत्र्याच्या अनुपस्थितीबद्दल माहिती दिली. मात्र, यामुळे सोशल मीडिया यूजर्सकडून त्याला आता ट्रोल केले जात आहे. 

गौरव तनेजाचा पाळीव कुत्रा माऊ त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. गौरव अनेकदा माऊसोबतचे व्हिडिओ शेअर करताना दिसतो. मात्र, बऱ्याच दिवसांपासून माऊ त्याच्या व्हिडिओंमध्ये दिसला नाही, त्यामुळे चाहते सतत माऊ कुठे आहे? असा प्रश्न विचार होते. 

आता गौरव तनेजाने आपल्या व्लॉगमध्ये सांगितले की, त्याने आणि त्याच्या कुटुंबाने माऊला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे काही समस्या निर्माण होत होत्या. तसेच गौरवच्या वडिलांना यामुळे त्रास होत होता. त्यामुळे कुटुंबाने त्याला त्यांच्या फार्महाउसवर सोडण्याचा निर्णय घेतला. 

गौरवने  माऊला फार्महाउसवर पाठवण्यामागे काही धार्मिक कारणांचाही उल्लेख केला. मात्र, त्याच्या या निर्णयावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अनेक यूजर्स त्याला अनफॉलो करत टीका करत आहेत. गौरव तनेजावर आता नेटिझन्स व्ह्यूजसाठी पाळीव प्राण्याचा वापर केल्याचा आरोप करत आहेत.