Ghibli-style images | सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे – ‘Ghibli Style’ फोटो. प्रत्येकजण अशाप्रकारचे हटके फोटो (Ghibli-style images) बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ChatGPT च्या नवीन अपडेटमध्ये अशाप्रकारचे फोटो तयार करण्याची सुविधा दिली जात आहे.
ओपनएआयच्या सीईओपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण हे हटके अॅनिमिटेड फोटो शेअर करत आहे. पण ही ‘Ghibli Style’ नक्की काय आहे? आणि तुम्ही असे फोटो कसे तयार करू शकता? जाणून घेऊया.
Ghibli स्टाइल म्हणजे काय?
घिबली आर्ट म्हणजे स्टुडिओ घिबलीच्या (Ghibli Studio) वैशिष्ट्यपूर्ण व्हिज्युअल शैलीसाठी प्रसिद्ध असलेली कला. ही स्टाइल अॅनिमे चाहत्यांमध्ये लोकप्रिय राहिली आहे. आता चॅटजीपीटीकडून देखील नवीन व्हर्जनमध्ये अशाप्रकारचे फोटो (Ghibli-style images) तयार करून दिले जात आहेत.
1985 मध्ये हायाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता आणि तोशियो सुझुकी यांनी स्टुडिओ घिबलीची स्थापना केली होती.हा स्टुडिओ हाताने काढलेल्या अॅनिमेशन, भव्य पार्श्वभूमी आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी कथांसाठी प्रसिद्ध आहे. “घिबली” हा शब्द लिबियन अरेबिक भाषेतील असून, तो उष्ण वाळवंटी वाऱ्याचा संदर्भ देतो.
ChatGPT वापरून Ghibli स्टाइल इमेज कशा तयार कराव्यात?
1. ChatGPT उघडा व नवीन व्हर्जन सुरू करा.
2. प्रॉम्प्ट बारवरील तीन डॉट्स क्लिक करा – तिथे “Image” पर्याय निवडा.
3.आता तुम्हाला हव्या असलेल्या इमेजचे वर्णन द्या.
4. इमेज तयार झाल्यावर डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा.
OpenAI ने GPT-4o मध्ये सुधारणा केल्या असून, नवीन मॉडेल अधिक अचूक आणि संदर्भानुसार इमेज तयार करू शकते.
मोफत AI टूल्स वापरून Ghibli इमेज कशा बनवाल?
ChatGPT व्यतिरिक्त, Craiyon, Playground AI आणि Deep AI सारख्या मोफत प्लॅटफॉर्मवरूनही घिबली स्टाइल फोटो बनवता येतात. फक्त मजकूर लिहा किंवा फोटो अपलोड करा, बाकी AI करेल. मात्र, GPT-4o प्रमाणे हे टूल्स अगदी हुबेहुब फोटो तयार करू शकत नाहीत.