Vodafone Idea Launches 5G Service | भारतात टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ (Jio) आणि भारती एअरटेल (Airtel) 5G बाजारात वर्चस्व गाजवत आहेत. मात्र, आता या दोन्ही कंपन्यांना टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आयडिया (VI) देखील सज्ज झाली आहे. टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) ने भारतात आपली 5G सेवा सुरू केली.
व्हीआयने मुंबईपासून 5G सेवेला ( Vi Launches 5G Service in Mumbai) सुरुवात केली असून लवकरच इतर पाच शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे. ही नवीन सेवा सुरू करून कंपनी ग्राहकांना जिओ आणि एअरटेलकडे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हीआय जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या टेलिकॉम बाजारात आपल्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांसमोर मजबूत स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
कंपनी लाँच ऑफर अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटा देणार आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, 5G सेवेसाठी सुरुवाती ऑफर अंतर्गत अनलिमिटेड 5G डेटा उपलब्ध केला जाईल. 5जी प्लॅनची सुरुवाती किंमत 299 रुपये असेल. यामुळे हा प्लॅन बाजारातील सर्वाधिक स्पर्धात्मक किंमतीचा पर्याय ठरेल. यासोबतच, कंपनीचे उद्दिष्ट स्ट्रीमिंग, गेमिंग आणि रिअल-टाइम क्लाउड ॲक्सेससारख्या उच्च-बँडविड्थ ॲप्लिकेशन्ससाठी वाढती मागणी पूर्ण करणे आहे.
कंपनी मुंबई पाठोपाठ बिहार, दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमधील इतर प्रमुख शहरांमध्येही लवकरच 5जी सेवा सुरू करणार आहे.
Viच्या 5G प्रीपेड प्लॅनची (Vi 5G Prepaid Plans) सुरुवात 299 रुपये पासून होते. यामध्ये दररोज 1GB डेटा मिळतो आणि वैधता 28 दिवसांची आहे. याशिवाय, कंपनीने 349 रुपये आणि 365 रुपयांचे प्लॅन देखील आणले आहेत. या प्लॅनमध्ये अनुक्रमे 1.5GB आणि 2GB दररोज डेटा मिळतो. सर्वात महागडा प्रीपेड प्लान 3,599 रुपयांचा आहे. यामध्ये 365 दिवसांसाठी दररोज 2जीबी डेटा मिळतो. याशिवाय, सर्व प्लॅन्समध्ये अनलिमिटेड 5G डेटा उपलब्ध असेल. कंपनीच्या पोस्टपेड प्लॅन्सची किंमत 451 रुपये ते 1201 रुपयांपर्यंत आहे.