Shiba Inu Burn | शिबा इनु (SHIB) या मीम क्रिप्टोकरन्सीच्या (cryptocurrency) बर्न (नष्ट) रेटमध्ये प्रचंड वाढ झाल्याने क्रिप्टोधारकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत SHIB चा बर्न रेट 8,470% ने वाढला आहे.
एका अज्ञात युजरने तब्बल 1 अब्ज SHIB टोकन्स कायमचे नष्ट (बर्न) केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आणि क्रिप्टो फोरमवर याची जोरदार चर्चा सुरू आहे.
SHIB बर्निंग (Shiba Inu cryptocurrency) म्हणजे काही टोकन्स कायमचे नष्ट करणे, जेणेकरून त्याचा पुरवठा कमी होईल आणि किंमत वाढण्याची शक्यता असेल. या व्यवहारात, 1 अब्ज SHIB टोकन्स एका अज्ञात वॉलेटमध्ये पाठवण्यात आले. हा व्यवहार $0.00001305 या दराने झाला आणि त्याची एकूण किंमत $13,050 इतकी होती.
शिबा इनु समुदायही टोकन्सची संख्या कमी करण्यासाठी सक्रिय आहे. गेल्या 24 तासांत 14 व्यवहारांद्वारे एकूण 1.004 अब्ज SHIB बर्न करण्यात आले. याशिवाय, ShibArmyStrong टीमने 5 व्यवहारांद्वारे 20,933 SHIB नष्ट केले. या सर्व प्रयत्नांमुळे बर्न रेटमध्ये मोठी वाढ झाली आहे.
आतापर्यंत, 410.74 ट्रिलियनहून अधिक SHIB टोकन्स कायमचे नष्ट करण्यात आले आहेत. याचा उद्देश SHIB चा पुरवठा नियंत्रित ठेवून त्याच्या किमतीत वाढ करणे हा आहे.