Shaheed Diwas 2025 | भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो जणांनी बलिदान दिले. हजारो जणांनी ब्रिटिशांविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. यापैकीच एक म्हणजे भगतसिंग. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील भगतसिंग (Bhagat Singh) यांचे योगदान कोण विसरू शकते?
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आघाडीवर असणारे भारतीय तरुणांचे आदर्श आणि धैर्याचे प्रतीक असलेल्या भगतसिंग यांची आज पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी, 23 मार्च 1931 रोजी त्यांना व त्यांचे सहकारी राजगुरू (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. हा दिवस दरवर्षी भारतात “शहीद दिवस” म्हणून पाळला जातो.
शहीद दिवसाचे महत्त्व विशेषतः भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांच्या बलिदानाशी जोडलेले आहे. 23 मार्च 1931 रोजी या तिन्ही वीरांना ब्रिटिश सरकारने लाहोर तुरुंगात फाशी दिली होती. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी भगतसिंग यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण केले.
1928 मध्ये भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी लाला लजपत राय यांच्या लाठीहल्ल्यादरम्यान झालेल्या मृत्यूसाठी जबाबदार असणार्या ब्रिटिश पोलिस अधिकाऱ्याची केली होती. 1929 मध्ये भगतसिंग यांनी आपल्या एका साथीदारासह केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकून “इन्कलाब जिंदाबाद” च्या घोषणा दिल्या. या घटनानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
23 मार्च 1931 रोजी ब्रिटिश सरकारने भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोर तुरुंगात फाशी दिली होती. या तिन्ही क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवला होता आणि आपल्या धैर्याने संपूर्ण भारतात क्रांतीची भावना जागृत केली होती.
शहीद दिवस केवळ भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीतच नाही, तर त्या सर्व वीरांच्या सन्मानार्थही पाळला जातो, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. हा दिवस आपल्याला देशभक्ती, धैर्य आणि त्यागाची प्रेरणा देतो.