SBI PO Vacancy: SBI मध्ये निकाली मोठी भरती, 85 हजार रुपये पगार, त्वरित करा अर्ज

 देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या प्रक्रियेद्वारे एकूण 600 रिक्त पदांवर भरती केली जाईल. 27 डिसेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना 16 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. इच्छुक उमेदवार एसबीआईच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून अर्ज करू शकतात.

पात्रता

इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

इच्छुक उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्ष असावे. म्हणजेच, उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 1994 पेक्षा आधी आणि 1 एप्रिल 2003 नंतरचा नसावा. एससी आणि एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाईल.

परीक्षेच्या तारखा

ऑनलाइन प्राथमिक परीक्षा8 ते 15 मार्च दरम्यान आयोजित केली जाईल. तर मुख्य परीक्षा एप्रिल/मे 2025 मध्ये आयोजित केली जाईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल व जून अखेरीस परीक्षेचा निकाल जाहीर होईल.

अर्ज करण्याची तारीख

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. उमेदवार 16 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क

अनारक्षित/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही.

SBI PO Vacancy 2025: अर्जाची प्रक्रिया

  • अर्ज करण्यासाठी सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in जा.
  • वेबसाइटच्या होम पेजवर “Latest Updates” लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर “State Bank of India SBI Probationary Officers PO Recruitment 2024” लिंकवर जा.
  •  आता “Apply Online” पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर मागितलेली माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्ज भरून सबमिट करा.