सलमान खानच्या ‘सिकंदर’ची दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई कमाई; पायरसीचा बसला फटका

Sikandar box office collection | अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिकंदर’ (Sikandar Movie) ईद-उल-फित्रच्या एक दिवस आधी (30 मार्च)  देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले असून, सिनेमाने 2025 मधील सर्वात मोठ्या ओपनिंगॆची नोंद केली आहे. 

ए. आर. मुरुगादॉस दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर (Sikandar box office collection) चांगली कमाई केली आहे. Sacnilk नुसार, ‘सिकंदर’ने पहिल्या दिवशी सुमारे 26 कोटी रुपयांची कमाई केली. हिंदी पट्ट्यात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रामुख्याने मुंबई आणि एनसीआरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गर्दी झाली होती. 

मुंबईत सुमारे 1,381 शोमध्ये 21.50% तर NCR मध्ये 1,894 शोमध्ये 21.75% गर्दी दिसून आली. ईदच्या सुट्टीमुळे दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निर्मात्यांच्या माहितीनुसार, ‘सिकंदर’ने जागतिक स्तरावर 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘टायगर 3’ पेक्षा कमी ओपनिंग, पण मोठ्या यशाची अपेक्षा

याआधी सलमानच्या ‘टायगर 3’ ने पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपये कमावले होते, त्यामुळे ‘सिकंदर’ची ओपनिंग तुलनेत थोडी कमी राहिली. मात्र, ‘टायगर 3’ अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करत भारतात फक्त 282.79 कोटीं पर्यंतच मजल मारू शकला.

गेल्या काही वर्षांतील सलमान खानच्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिस ट्रेंड

  • ‘किसी का भाई किसी की जान’ (2023) – 184.6 कोटी (जगभरात)
  • ‘अंतिम’ (2021) – 58.5 कोटी (जगभरात)
  • ‘राधे’ (2021) – 18.33 कोटी (जगभरात)

या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे ‘सिकंदर’कडून मोठ्या यशाच्या अपेक्षा आहेत.

पायरसीचा फटका बसण्याची शक्यता

चित्रपटगृहांमध्ये गर्दी तुलनेने कमी असल्याने ‘सिकंदर’च्या कमाईवर पायरेसीचा परिणाम होऊ शकतो. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही तास आधीच चित्रपटाची कॉपी ऑनलाइन लीक झाली आहे.

‘सिकंदर’मध्ये दमदार स्टारकास्ट

या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदाना, सत्यराज, काजल अग्रवाल आणि शरमन जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.