Donald Trump announced reciprocal tariffs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत, चीन आणि अन्य 13देशांवर मोठ्या प्रमाणात परस्पर शुल्क (Reciprocal Tariffs) लागू करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी या शुल्कांना “सवलतीच्या दरातील परस्पर शुल्क” असे संबोधले असून, ते या देशांवर अमेरिकेवर आकारल्या जाणाऱ्या शुल्काच्या निम्मे शुल्क आकारत असल्याचे स्पष्ट केले आहे. याअंतर्गत भारतावर 26% आणि चीनवर 34% आयात शुल्क लागू करण्यात येणार आहे.
भारतावरील शुल्काबाबत ट्रम्प यांचे मत
भारतासंदर्भात बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Trump Tariff Announcement) यांनी दिल्लीद्वारे आकारले जाणारे शुल्क कठोर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत, मात्र भारत (Tarriff on India) आमच्यावर 52% शुल्क लावतो. त्यामुळे आम्ही त्याच्या निम्मे म्हणजे 26% शुल्क लागू करत आहोत.” अमेरिकेने विविध देशांवर वेगवेगळ्या प्रमाणात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे.
ट्रम्प म्हणाले, “2 एप्रिल हा दिवस अमेरिकेच्या मुक्ती दिन म्हणून ओळखला जाईल – जेव्हा आम्ही आमचे उद्योग परत मिळवले.”
कोणत्या देशांवर किती शुल्क लागू होणार?
अमेरिकेने चीनवर 34%, व्हिएतनामवर 46%, जपानवर 24%, भारतावर 26% (Trump’s 26% tariffs on India), दक्षिण कोरियावर 25%, थायलंडवर 36%, मलेशियावर 24%, कंबोडियावर 49%, बांगलादेशवर 37%, सिंगापूरवर 10%, फिलिपाइन्सवर 17%, पाकिस्तानवर 29%, श्रीलंकेवर 44%, म्यानमारवर 44% आणि लाओसवर 48% शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, युरोपियन युनियनवर 20% शुल्क लावले जाणार आहे.
नवीन शुल्क कधी लागू होणार?
व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, 10% आधारभूत शुल्क 5 एप्रिलपासून लागू होणार आहे. विशिष्ट देशांसाठी निश्चित करण्यात आलेले उच्च शुल्क 9 एप्रिलपासून लागू होईल.