Royal Enfield Shotgun 650 Icon Edition लाँच, भारतात केवळ 25 ग्राहकांना खरेदी करता येणार बाइक

रॉयल एनफिल्डने शॉटगन 650 चे आयकॉन एडिशन लाँच केले आहे. या स्पेशल एडिशनचे केवळ 100 यूनिटची जगभरात विक्री होणार आहे. या यूनिट्सची APAC, युरोप आणि अमेरिकन बाजारपेठेमध्ये या स्पेशल यूनिट्सची विक्री होणार आहे.

Royal Enfield Shotgun 650 Icon Edition च्या केवळ 25 यूनिट्सची भारतात विक्री होणार आहे. या बाइकची सुरुवातीची किंमत 4.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाईक घेणाऱ्या ग्राहकांना आयकॉनने खास डिझाइन केलेले स्लॅबटाउन इंटरसेप्ट रॉयल एनफिल्ड जॅकेट देखील मिळणार आहे.

रॉयल एनफिल्डने या लिमिटेड एडिशनला खास डिझाइनसह सादर केले आहे. ही बाइक तीन वेगवेगळ्या शेड्सच्या पेंट स्कीमसह येतो. यामध्ये रेट्रो रेस प्रेरित ग्राफिक्स देण्यात आले आहे. बाईकला गोल्डन-कलरचे रिम्स देण्यात आले आहेत, तर रियर सस्पेन्शन निळ्या रंगात तयार करण्यात आले आहे. फ्लोटिंग सीट लाल रंगाचे आहेत.

डिझाइन व्यतिरिक्त सांगायचे तर यामध्ये पूर्वीप्रमाणेच 648ccच्या पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 47 hpची कमाल पॉवर आणि 51 Nmचा पीक टॉर्क निर्माण करते. यासोबत 6 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

भारतामध्ये रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 आयकॉन एडिशन खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना RE अॅपद्वारे नोंदणी करावी लागेल. भारतीय बाजारपेठेत 6 फेब्रुवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,12 फेब्रुवारीपासून बाइक खरेदीसाठी उपलब्ध असेल.