पॉवरफुल Royal Enfield Classic 650 बाईक भारतात लाँच, किंमत-फीचर्स जाणून घ्या

Royal Enfield ने त्यांची बहुप्रतिक्षित Classic 650 बाईक भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपनीने ही बाइक 3.37 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत सादर केली आहे. ही बाईक हॉटरोड, क्लासिक आणि क्रोम अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. तसेच, ग्राहक ब्रंटिंगथॉर्प ब्लू आणि वल्लम रेड अशा दोन रंगामध्ये Royal Enfield  Classic 650 बाईकला खरेदी करू शकतात. 

Royal Enfield Classic 650 चे क्लासिक व्हेरिएंट एक्सक्लुझिव्ह टेल रंगातील व्हेरिएंटची किंमत 3.41 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर याचे टॉप-स्पेक व्हेरिएंट, जे ब्लॅक क्रोममध्ये उपलब्ध आहे, त्याची किंमत 3.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे, ही बाइक सध्या उपलब्ध असलेल्या शॉटगन 650 पेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात आली आहे. 

Royal Enfield  Classic 650 चे फीचर्स आणि इंजिन

Royal Enfield Classic 650 मध्ये  648cc चे दमदार पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन स्लिपर क्लचसह सहा-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडण्यात आले आहे. इंजिन 46.3bhp पॉवर आणि 52.3Nm टॉर्क निर्माण करते. 

Royal Enfield च्या या बाईकमध्ये देण्यात आलेली गोल एलईडी हेडलाइट, टीअरड्रॉप आकाराचा फ्युएल टँक आणि कर्व्हड फेंडर या बाइकला स्टायलिश लुक देतात. 

फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास बाइकमध्ये एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प, अ‍ॅडजस्टेबल लीव्हर्स, USB टाइप-C चार्जिंग पोर्ट, ट्रिपर नेव्हिगेशन आणि ड्युअल-चॅनेल ABS उपलब्ध आहे.  

दरम्यान, कंपनीने Royal Enfield Classic 650 चे बुकिंग सुरू केले आहे. ग्राहक रॉयल एनफिल्डच्या अधिकृत शोरूममध्ये जाऊन बाईकचे बुकिंग करू शकतात.