Waghya Dog Controversy | रायगडावरील (Raigad) वाघ्या कुत्र्याची (Waghya Dog) समाधी हटवण्याचा मुद्दा गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित याबाबत मागणी केली आहे. तसेच, ही समाधी 31 मे 2025 पर्यंत हटवावी असे म्हटले आहे.
एकीकडे वाघ्या कुत्र्याबाबत इतिहासत कुठेच उल्लेख नसल्याचे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी ही समाधी हटवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ही समाधी हटवू नये असेही मत काहीजण व्यक्त केले जात आहे.
संभाजीराजे छत्रपती पत्रात काय म्हणाले?
संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधीलगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी केली आहे. त्याने लिहिले की, ही समाधी कपोलकल्पित आहे. वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ नाही.
या कुत्र्याबाबत कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही. त्यामुळे ही समाधी रायगडावरील एकप्रकारे अतिक्रमण असून, 31 मे 2025 पर्यंत ही समाधी हटवावी, अशी मागणी त्यांनी केली.
इंद्रजीत सावंत यांनी दिली वाघ्या कुत्र्याची माहिती
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी देखील वाघ्या कुत्र्याबाबत इतिहासत कुठेच नोंद आढळत नसल्याचे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद आढळत नाही. राम गणेश गडकरींच्या नाटकातून वाघ्या कुत्रा पात्राची निर्मिती झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.