Ram Charan’s birthday | जगभरात स्वतःची ओळख निर्माण करणारा सुपरस्टार राम चरण (Ram Charan’s birthday) आज 40वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्ताने त्याने चाहत्यांना एक खास सरप्राइज दिले आहे. राम चरणने त्याचा आगामी चित्रपट RC16 चे पहिले पोस्टर रिलीज केले आहे.
राम चरणच्या (Ram Charan) चाहत्यांकडून त्याच्या बहुप्रतिक्षित RC16 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिला जात आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या निर्मात्यांनी अखेर पहिला लूक (RC16 Movie’s First Look) प्रदर्शित केला आहे.
मिथ्री मूव्ही मेकर्सने सोशल मीडियावर राम चरणचा दमदार लूक असलेले जबरदस्त पोस्टर शेअर केले आहे, ज्यामुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे. राम चरणच्या या चित्रपटाचे नाव PEDDI असे आहे.
𝐀 𝐌𝐀𝐍 𝐎𝐅 𝐓𝐇𝐄 𝐋𝐀𝐍𝐃, 𝐀 𝐅𝐎𝐑𝐂𝐄 𝐎𝐅 𝐓𝐇𝐄 𝐍𝐀𝐓𝐔𝐑𝐄 ❤️🔥#RC16 is #PEDDI 🔥💥
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) March 27, 2025
Happy Birthday, Global Star @AlwaysRamCharan ✨#HBDRamCharan#RamCharanRevolts@NimmaShivanna #JanhviKapoor @BuchiBabuSana @arrahman @RathnaveluDop @artkolla @NavinNooli… pic.twitter.com/ae8BkshtR3
वाढदिवसानिमित्त राम चरणने आगामी चित्रपटाच्या पोस्टर आणि नावाची घोषणा करत चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. राम चरणचा हा 16वा चित्रपट आहे. या चित्रपटात राम चरणसोबतच जान्हवी कपूर, शिवा राजकुमार, जगपती बाबू आणि दिव्येंदु शर्मा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक बुच्ची बाबू सना आहेत.
दरम्यान, राम चरण आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत होत आहे. त्याचा जन्म 27 मार्च 1985 रोजी चेन्नई येथे झाला राम चरण दक्षिण भारतीय सिनेमातील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. अभिनेत्याने 2007 मध्ये पुरी जगन्नाथ यांच्या चिरुथा या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.