Ram Charan: ‘गेम चेंजर’साठी अभिनेता राम चरणने किती मानधन घेतले? वाचा

Ram Charan New Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा (Ram Charan) ‘गेम चेंजर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम चरणचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहे. पॉलिटिकल ड्रामा असलेल्या या चित्रपटामध्ये राम चरण डबल रोलमध्ये दिसणार आहे.

या चित्रपटामध्ये राम चरणची (Ram Charan) एक भूमिका राजकीय नेता व दुसरी भूमिका आयपीएस अधिकाऱ्याची आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 ला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची थिएटरमध्येही गर्दी होऊ शकते.

चित्रपटात राम चरणसोबत झळकणार कियारा

राम चरण (Ram Charan) तीन वर्षांनंतर चित्रपटात झळकणार आहे. याआधी त्याने 2022 साली आलेल्या ‘RRR’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. गेम चेंजरमध्ये राम चरणसोबतच (Ram Charan New Movie) अभिनेत्री कियारा आडवाणीची (Kiara Advani) देखील मुख्य भूमिका आहे. यासोबतच, एसजे सूर्या, अंजली, श्रीकांत आणि प्रकाश राज हे देखील महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन एस शंकर यांनी केले आहे.

चित्रपटासाठी राम चरणने (Ram Charan) किती मानधन घेतले?

गेम चेंजर चित्रपटाचे बजेट तब्बल 450 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. यातील 75 कोटी रुपये केवळ 4 गाण्यावर खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटासाठी राम चरणने 65 कोटी रुपये मानधन घेतले आहेत. तर दिग्दर्शक एस शंकर यांनी 35 कोटी व अभिनेत्री कियारा आडवाणीने 5 ते 7 कोटी रुपये मानधन घेतले आहे.